DR. ANIL MULIK

WhatsApp Image 2021-12-04 at 4.03_edited.jpg

डॉ. अनिल मुळीक यांचे
दिव्यस्पर्शी स्पंदन मसाज


महायोगी तपस्वी परमपूज्य गगनगिरी महाराज आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मसाजतज्ञ डॉ. राम भोसले यांचा कृपाशीर्वाद लाभलेले स्पंदन मसाजतज्ञ डॉ. अनिल मुळीक यांनी आपल्या मसाज कलेचा लौकिक  देशात आणि विदेशातही मिळवलेला आहे. कांचन या कलेमुळे शेकडो रुग्ण बरे झाले आहेत. अशा प्रकारचे कौशल्य मिळवलेले ते एकमेव असे तज्ञ आहेत.

MORE INFO

सांगली जिल्ह्यातील वाळवा गावचे रहिवासी असलेले डॉ. अनिल मुळीक हे शेतकरी कुटुंबातून आलेले आहेत. स्वातंत्र्य लढ्यातील थोर नेते क्रांतिवीर, पद्मभूषण, डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांनी उभारलेल्या किसन अहिर सहकारी साखर कारखान्यात नोकरी करतात. नोकरी करत करत त्यांनी स्पंदन मसाजाचा अभ्यास करण्याचा ध्यास घेतला. प्रारंभी ॲक्युप्रेशर थेरपीचे बाळकडू त्यांना जी. एन. पाटील यांच्याकडून मिळाले. मग त्यांना या गोष्टीचा छंद लागला.


या गोष्टीचा अभ्यास करत असतानाच परमपूज्य गगनगिरी महाराज यांच्या सान्निध्यात ते आले.  १९९०- ९१ या काळात डॉ. मुळीक यांच्या आयुष्यात साधनेच्या प्रवाहाबरोबर उपचार पंचाचा नवा प्रयोग प्रत्यक्षात आकाराला आला. ॲक्युप्रेशर सुजोक आणि स्पंदन मसाज याचे तंत्र त्यांनी बारकाईने आत्मसात केले. वेदनेपासून मुक्तता देणारे गगनगिरी टेक्निक त्यांनी शिकून घेतले. पुढे ते अधिकच विकसित केले. त्यासाठी वर्षानुवर्षे आपली प्रॅक्टीस चालू ठेवली. त्यांनी पाठीच्या, मणक्याच्या व डोक्याच्या वेदना असलेल्या अनेक आव्हानात्मक रुग्णांना बरे केले. शरीराच्या प्रत्येक नसांचा अभ्यास आणि नवनवीन संशोधन त्यांनी सुरू ठेवले. शरीराची शुद्धी करणे, प्रत्येक नसांमध्ये एका वेगळ्या चैतन्याची ऊर्जा निर्माण करणे, मूलाधार चक्रापासून मेंदूपर्यंत सहस्त्रार चक्रापर्यंत मानवी शरीराला धावण्यासाठी एक शुद्ध व जागृत अवस्थेत नेणे ही त्यांच्या कलेची खास वैशिष्ट्ये आहेत. मानदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी, पाठदुखी असे अनेक रूग्ण या उपचार पद्धतीने बरे केले आहेत. मानवी शरीर हे एक ताल आहे, लय आहे, तसेच संपूर्ण विश्वामध्ये एकताल आहे. याचा अचूक वेध घेऊन व्याधिग्रस्त व्यक्तीचा बिघडलेला ताल आणि विश्वाचा समतोल साधता आला की माणूस व्याधीमुक्त होतो हा सिद्धांत डॉ. मुळीक यांनी अखंड संशोधनातून मांडला आहे.

IMG-20211204-WA0037.jpg